![]() |
| ऊसतोडणी मजुरांच स्थलांतरित जगणं |
ऊसतोडणी मजुरांच स्थलांतरित जगणं : गोड साखरेची कडू कहाणी
असंघटित क्षेत्रातील मजुरांचे प्रमाण सतत वाढत आहे. शेतीक्षेत्रातील अनेक पेचप्रसंगातून अल्पभूधारक व भूमिहीन शेतमजूर असंघटित क्षेत्रात येत आहेत. त्यातील एक मोठी संख्या उसतोडणीचे काम करते, ऊसतोड मजुरांचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रश्न असो किंवा स्थलांतराचे प्रश्न असो किंव्हा जगण्याचे प्रश्न असो त्याची तीव्रता वाढत आहे. या सर्व प्रश्नांचा आढावा " ऊसतोडणी मजुरांचे स्थलांतरित जगणं " पुस्तकात घेण्यात आला आहे. ऊसतोडणी मजुरांचे स्थलांतरित, उपेक्षित जीवनाचे विविध पैलू , श्रमाचा मोबदला, ऊसतोडणी मजुरांच्या जीवनमनाचे प्रश्न आणि त्याला लागून येणारे शिक्षण , आरोग्य, रोजगाराचा प्रश्न कसे गंभीर बनत आहेत याची चर्चा पुस्तकातून केली आहे. प्रस्तुत पुस्तक / अहवाल हा युनिक फाऊंडेसनने केस स्टडी पद्धतीने केलेल्या संशोधन प्रकल्पाचा अहवाल आहे. ऊसतोडणी कामगारांच्या मुलाखती, चर्चेच्या आधारे अहवालाची मांडणी केली आहे. मजुरांच्या विविध प्रश्नांबरोबर त्यांच्यातील कामगार संघटना, त्यांचे राजकारण आणि सोबत त्यांच्या प्रश्नांवर काही उपाय - योजनांवर प्रकाश टाकलेला आहे.

ConversionConversion EmoticonEmoticon