‘द युनिक फाउंडेशन’ ची भूमिका
‘ज्ञानातून सक्षमीकरण’ हे ब्रीद स्वीकारून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रात गेली बारा वर्षे भरीव कामगिरी करणार्या ‘द युनिक अॅकॅडमी’ची ‘द युनिक फाउंडेशन’ ही एक महत्त्वपूर्ण सुरुवात आहे. शिक्षण, प्रशिक्षण आणि विशेषतः संशोधनाद्वारे सामाजिक-राजकीय क्षेत्रात सकारात्मक हस्तक्षेपघडवून आणणे हे उद्दिष्ट ठेवून सार्वजनिक क्षेत्रात उतरलेल्या ‘द युनिक फाउंडेशन’ने गेल्या सात वर्षांत विविध कळीच्या प्रश्नांवरील संशोेधन प्रकल्प, पुस्तक प्रकाशने, चर्चा, परिसंवाद व व्याख्यानमाला यांसारखे उपक्रम राबवले आहेत. तसेच विद्यमान अभ्यासक्रमातील मर्यादा लक्षात घेऊन नावीन्यपूर्ण आणि आशयघन स्वरूपाच्या अल्पकालीन अभ्यासक्रमांची आखणी करून विद्यमान शिक्षणक्षेत्रात पूरक कामगिरी करण्याच्या मार्गावर आहे. प्रचलित ज्ञानसंकल्पना - गृहीतकांना प्रश्नांकित करून चिकित्सक वैचारिक दृष्टिकोन विकसित करण्यावर फाउंडेशनच्या कामाचा भर आहे. महाराष्ट्र हे अभ्यासक्षेत्र निश्चित करून जनसामान्यांच्या जगण्याशी निगडित असणार्या समस्या व धोरणांचा चिकित्सक दृष्टिकोनातून अभ्यास करणे, त्यांचे निष्कर्ष अहवाल स्वरूपात प्रकाशित करणे हा फाउंडेशनच्या कामाचा गाभा राहिला आहे.
मुक्ता कुलकर्णी । विवेक घोटाळे

ConversionConversion EmoticonEmoticon